बाळासाहेबांवरील बायोपिक आता हिंदीतून!

0

राहुल ठाकरे यांनी आजोबांवर म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बयोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट हिंदीतून असणार आहे.

राहुल ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे मधले चिरंजीव जयदेव आणि त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांचे राहुल हे सुपुत्र आहेत. राहुल यांचे कॅनडात फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे.

राहुल यांनी यापूर्वी हिंदी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे.

राहुल यांनी दसऱ्याला फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज करून चित्रपटाबद्दल माहिती दिली.

या चित्रपटाबद्दल अन्य कोणतीच माहिती समोर आलेली नाही. बहुदा अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

LEAVE A REPLY

*