विद्यार्थ्यांना शाळेत आता बायोमेट्रिक हजेरी

विद्यार्थ्यांना शाळेत आता बायोमेट्रिक हजेरी

नाशिक | प्रतिनिधी 

आता विद्यार्थ्यांचे हजेरी मस्टर इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. अगदी सुरुवातीला जय हिंद गुरुजी, ‘हजर गुरुजी’, ‘यस सर’चा आवाज देखील आता इतिहासात आठवण म्हणून राहणार आहे.

आता शाळेत बायोमेट्रिक हजेरी लावली जाणार आहे. आतापर्यंत शाळेत हजेरी घेण्याची जुनी पद्धत होती. मुलं हजर गुरुजी किंवा यस सर म्हणायची.

अगदी १९९७, १९९८ च्या काळात जय हिंददेखील म्हटले जायचे. मात्र आता ही पद्धत आता बंद होणार आहे. कारण या पुढं हजेरी नोंदवतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचा वापर करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे शैक्षणिक संस्थांना बायोमेट्रिक हजेरीसाठीच्या यंत्रणेचा खर्च करावा लागणार आहे.

या पद्धतीने हजेरी घेतली तर वेळ जाणार हे निश्चित, एका शाळेत हजारांवर मुलं असतात, ही मुलं रांगेत जरी लागली तरी सर्व विद्यार्थ्याची हजेरी घायायला अधिक वेळी खर्ची पडणार आहे.

बायोमेट्रिक हजेरीमुळे शाळांची डोकेदुखी वाढणार आहे. एका शाळेतली बायोमेट्रिक हजेरी पूर्ण करण्यासाठी चार तासांचा वेळ जाईल असा दावा संस्थाचालकांचा आहे. संस्थाचालक आणि शिक्षक आमदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

बायोमेट्रिक हजेरीमुळे बोगस पटसंख्या दाखवता येणार नाही. यामुळे सरकारच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. पण या नव्या पद्धतीमुळे हजेरीची पूर्वापार चालत आलेली प्रथा कायमची इतिहास जमा होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com