Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक मधील रेल्वे प्रकल्पास कोट्यवधींचा निधी : खा. डॉ. भारती पवार

Share

जानोरी | वार्ताहर :

महाराष्ट्रातील सर्वे केलेल्या रेल्वे प्रकल्पा संदर्भात दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेमध्ये विचारलेल्या रेल्वेच्या प्रश्नांनुसार रेल्वे मंत्रालयाकडून 5 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये मध्यरेल्वेवरील दौंड ते मनमाड या 236 किलोमीटर अंतरावर करिता प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्याचे काम देखील सुरू झाले आहे.

त्याच बरोबर मनमाड ते जळगाव पर्यंत तिसरी लाईन हा 160 किलोमीटर अंतराचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्याचेही काम सुरू झाले आहे आणि इगतपुरी ते मनमाड या मार्गावर तिसरी लाईन टाकण्याकरिता 124 किलोमीटर अंतरावरील प्रकल्पास ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ यांचे मार्फत आयडेंटिफाय करण्यात आला आहे. या सविस्तर अहवालाची तपासणी देखील सुरू झाली आहे.

मतदार संघातील रेल्वे मार्गावरील विविध प्रकल्पांकरिता मंजुरी देऊन भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल खा. डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार व्यक्त केले.

सद्यस्थितीत 38 प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये 5879 किलोमीटर लेन करता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे. या नवीन प्रकल्पांमध्ये सोळा नवीन लाईनचे काम 2043 किलोमीटर इतक्या अंतराचे मंजूर करण्यात आले आहे. 5 गेज रूपांतरण प्रकल्पाकरिता 1135 किलोमीटर अंतरकरिता मंजूरी देऊन निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सतरा डब्बलींग प्रकल्पातील 2701 किलोमीटर आंतर करिता मंजूरी देण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!