Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवाजीनगरमध्ये जळीतकांड; पूर्ववैमनस्यातून चार दुचाकी जाळल्या

Share

सातपूर। प्रतिनिधी

सातपूरच्या शिवाजीनगर भागातील इमारतीखाली पूर्व द्वेषातून एका इसमाने 7 गाड्या जाळल्याने परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.  दरम्यान, पोलिसांनी तातडीने उपाय योजना करुन 24 तासात त्यातरुणाला ताब्यात घेतल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

शिवाजीनगर भागातील निगळ बिल्डींगच्या मागील बाजूस असलेल्या क्षत्रीय हाईटस् या नव्या इमारतीत काल पहाटे 2 वाजेच्या सूमारासपार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गणेश शिंदे (एमएच-15, बीवाय 5788), अश्विनी शिंदे (एमएच 15, एफ ई 0670), महेश बोरुडे(एमएच17, एआर 9105), विजय पाटील (एमएच 15-ईटी 1337), निलेश अहिरराव (एमएच15 डीपी 8845), संदिप पवार (एमएच 38, क्यू 4863) या सात वाहनांना अचानक पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर नागरीकांनी तातडीने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची नोंद पोलिसांतही नोंद करण्यात आली. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी सुरज आंबोरे याला ताब्यात घेत घटनास्थळी हजर करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दिनकर पाटील आ. सिमा हिरे तसेच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी दाखल झाले होते. पोलिस आयुक्तांनी नागरीकांची भूमिका समजून घेत त्या संशयीताकडून घटनेमागचे कारण उलगडून घेतले. याठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी स्थानिकांनी पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!