दुचाकी चोरांकडून गावठी पिस्तूल हस्तगत

0

 श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शहरातील काही लोकांकडे चोरीच्या गाड्या असल्याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. आतापर्यंत तब्बल 9 चोरीच्या गाड्या जप्त केल्या आहे. दुचाकीबरोबरच त्याच आरोपींकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळताच एका विहिरीतून 10 तास पाणी उपसल्यानंतर विहिरीच्या तळातून पिस्तूल हस्तगत केले.

गेल्या अनेक दिवसांपासून श्रीगोंदा शहरात चोरीच्या दुचाकींवर जप्त केल्या आहे. श्रीकांत पंडित घोडके (रा. शिधार्थनगर), राजेश हरिभाऊ वटकर (रा.ढोरगल्ली) व अविनाश आकाश घोडके (रा.सिधार्थनगर, सर्व श्रीगोंदा) यांना अटक केलेली आहे. या गुन्ह्यातील अजूनही चार जण पसार असल्याची माहिती पोलिसाकडून देण्यात आली होती. मात्र अटकेत असलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडे गावठी प्रकारचे कट्टे असल्याची माहिती अटकेतील आरोपींनी दिली.

त्यानुसार शोधकार्य सुरु केले असता शहरातील श्रीगोंदा-जामखेड रोडवर हॉटेल सोनाली जवळील लेंडी नाल्याजवळ एका विहिरीत एक गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्या विहिरींमधील पाणी मोटारीच्या सहाय्याने उपसून तब्बल 10 तासानंतर विहिरीतून एक गावठी बनावट आलेले पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. 452/2017 मधील आरोपी अविनाश आकाश घोडके यांच्यावर आर्मी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*