Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पाथर्डी फाटा येथे दुचाकी जाळल्या

Share

इंदिरानगर | प्रतिनिधी

आज पहाटे अज्ञात व्यक्तीने पाथर्डी परिसरात दुचाकी जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून नियमित घडणाऱ्या घटनांना नाशिक शहर पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

आज पहाटे चार वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा चौकीच्या पाठीमागे ही घटना घडली. यावेळी धूर आणि आगीचे लोळ बाहेर येतांना परिसरातील नागरिक जागे झाले त्यांनी घटनास्थळी धाव घेत जळत असलेल्या तीन दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला. यात एक दुचाकी वाचवण्यात यश आले तर इतर दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या.

युनिट तीनच्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकणी पोलीस तपास सुरु आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!