Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशभाजपचा आग्रहामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मी तयार झालो

भाजपचा आग्रहामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मी तयार झालो

पाटणा

“माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”, असे नितीशकुमार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या पेचामुळे भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांचे वक्तव्य महत्वाचे आहे.

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी पार पडणार असून यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एनटीएच्या बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि बिहार भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. भाजपच्या वतीने नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

शनिवारी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी दिल्लीहून आले आहेत. नितीश यांच्या मंत्रीमंडळात कोण आणि किती उपमुख्यमंत्री असतील, याचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर नितीश राज्यपाल फागु चौहान यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा सादर करतील. सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे.

सुशील मोदींचे नाव निश्चित, पण…

बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री, सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री आणि विजय कुमार चौधरी विधानसभा अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित आहे. नितीश यांचे नाव एनडीएकडून, सुशील कुमार मोदी आणि चौधरी यांचे नाव नितीशच्या बाजूने येत आहे. परंतु बैठकीत भाजपकडून उपमुख्यमंत्री पदा संदर्भातही नवीन भूमिका येऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या