भारताचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद?

0

नवी दिल्ली, १९ : सध्या बिहारच्या राज्यपालपदी असलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज केली आहे.

जर पक्षीय बळाबळ जमविण्यात भारतीय जनता पार्टीसह त्यांच्या सहकारी पक्षाला अर्थातच एनडीएला यश आले, तर पुढील राष्ट्रपतीपदी ७३ वर्षीय कोविंद विराजमान होण्याची मोठी शक्यता आहे.

मुळचे कानपूर, उत्तर प्रदेश येथील रामनाथ कोविंद हे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य होते. १९९१ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर १९९४मध्ये उत्तरप्रदेश मधून राज्यसभेवर निवडून गेले.

त्यानंतर भाजपा तर्फे सलग १२ वर्षे ते राज्यसभेचे खासदार राहिले. सध्या ते बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय कोळी समाजाचे ते अध्यक्ष होते.

१ ऑक्टोबर १९४५चा जन्म असलेले कोविंद हे वकीलीचे पदवीधर असून १९७७ ते १९७९ पर्यंत त्यांनी दिल्ली हायकोर्टात केंद्रसरकारचे वकील म्हणून काम पाहिले.

LEAVE A REPLY

*