Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

बिहारचे पोलीस महासंचालक पांडे याचं अजब विधान

Share

पटणा- बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अजब विधान केले आहे. पोलीस महासंचालक पांडे यांनी गुन्हे घडणारच नाही, असा दावा कोणीच करू शकत नाही. गुन्हे होतात आणि होतच राहणार. हा तर उंदरा-मांजराचा खेळ आहे, असं धक्कादायक विधान पांडे यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पांडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यावर संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत.

वाढत्या गुन्हेगारीबाबत एका पत्रकाराने पोलीस महासंचालक पांडे यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते पत्रकरावरच संतापले. तुम्ही एक तर पत्रकारितेत नव्याने आला असाल किंवा तुम्हाला प्रश्न कसा विचारावा हे माहित नसेल. गुन्हे घडणारच नाही, असा दावा कोणी करू शकेल का? गुन्हे तर घडतच राहणार. त्याला आळा घालणं हे पोलिसांचं कामच आहे. देव सुद्धा गुन्हे रोखू शकत नाहीत. 15-16 वर्षांची मुलं दारू पितात, स्मॅक खातात. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे, असं पांडे यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!