Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशबिहार निवडणूक : राजदचे 29, जदयूचे 25 उमेदवार कोट्यधीश

बिहार निवडणूक : राजदचे 29, जदयूचे 25 उमेदवार कोट्यधीश

पाटणा –

बिहार विधानसभा निवडणुकीत महायुती, महाआघाडीसह अन्य राजकीय पक्षांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या उमेदवारांना

- Advertisement -

रिंगणात उतरवले आहे. याशिवाय काही पक्षांच्या उमेदवारांनी आपला व्यवसाय मजुरी असल्याचे नमूद केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे आलेल्या आकड्यांनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीत भलेही मतदार कंगाल असो, परंतु उमेदवार मात्र कोट्यवधी रुपयांचे धनी असल्याचे दिसून आले आहे. यात मतदानाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाने कोट्यवधी संपत्तीचे सर्वांधिक 29 उमेदवार उतरवले आहेत. संयुक्त जनता दल अर्थात् जदयूच्या 25 कोट्यवधी संपत्तिधारक उमेदवारांचा समावेश आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनतांत्रिक पार्टीने कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक असलेल्या 23 जणांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टीपासून अन्य काही पक्षांसह मायावतींच्या बसपापर्यंतच्या उमेदवारांची संपत्ती एक लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. उल्लेखनीय म्हणजे सुल्तानगंज येथील सोशल युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) या पार्टीचे उमेदवार नरेश दास यांची संपत्ती केवळ आणि केवळ 3 हजार 500 रुपये इतकीच आहे.

गायघाट मतदारसंघातील भारतीय लोकमत राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार 50 वर्षीय रिजवानुल हक आणि त्यांच्या पत्नीजवळ एकूण 65 हजार रुपये रोख आहेत. 4.51 लाखांची गुंतवणूक असून, जमीन 55 लाख मूल्यांची आहे. तसेच, व्यवसाय शेती असल्याचे घोषणापत्रात म्हटले आहे. याच मतदारसंघातील अन्य एक राजपाल दास (राष्ट्रीय जन विकास पार्टी) आणि पत्नीजवळ 60 हजार रोख, 1.27 लाख रुपयांची गुंतवणूक असून, मजुरी करत असल्याचा उल्लेख आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या