Video : बिग बॉस विजेत्या शिल्पा शिंदेचा डान्स बघून तुम्हीही थक्क व्हाल…

0
मुंबई | टीव्ही मालिकेतील अंगुरी भाभी अर्थात मराठमोळी शिल्पा शिंदे यंदाची बिग बॉस २०११ विजेती झाल्यानंतर आता काय करत असावी असा प्रश्न सर्वानाच पडत असावा.

बिग बॉसचा किताब आपल्या नावावर केल्यानंतर शिल्पा अजून दिसली नव्हती. मात्र अचानक एका पार्टीत शिल्पाने हजेरी लावत ठुमकेदेखील लगावले. तेव्हा अनेकांच्याच भुवया उंचावल्या. याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती तसेच  अनेकांनी शिल्पासोबत फोटोसेशनदेखील केले. पार्टीचा व्हिडीओ आणि वृत्त बॉलीवूड लाइफने दिले आहे. या पार्टीचा सध्या व्हिडीओ व्हायरल झाला असून प्रचंड लाईक्स मिळाल्या आहेत.

शिल्पाची जवळची मैत्रीण रश्मी शर्माने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी शिल्पा दाखल होताच पार्टीचे रुपडेच पालटले.

इतकेच नाही तर शिल्पाने चक्क आपल्या मित्र आणि आप्तेष्टांसह थिरकण्याचा आनंददेखील घेतला. पार्टीत शिल्पाचा डान्स बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी यावेळी फोटोसेशनदेखील केले.

शिल्पाचा या पार्टीतला व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून तिच्या डान्सला चाहत्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*