Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

‘बिग बॉस’मुळे अनुप जलोटा आर्थिक अडचणीत

Share

मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटा एकामागोमाग एक गौप्यस्फोट करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून मला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करेपर्यंत सारं काही सुरळीत सुरू होतं मात्र त्या घरात प्रवेश केल्यानंतर मला तोटा सहन करावा लागत आहे असं अनुप यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

‘बिग बॉस’मधून बाहेर येताच त्यांनी आपल्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता काही गोष्टी स्पष्ट केल्या. जसलीनसोबत आपण रिलेशनशिपमध्ये नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. तिच्यासोबतचं नातं हे एका गुरु-शिष्याच्या नात्याप्रमाणे असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यामागोमागच आता त्यांनी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे आपलं आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.

आपल्या आर्थिक अडचणीविषयी जलोटा यांनी सांगितल्यानंतर आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे आता येत्या काळात या साऱ्याचे काय पडसाद असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!