#BiggBoss11 : जुबैर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडण्याची शक्यता!

0

‘बिग बॉस 11’ रिअॅलिटी शोला सुरुवात होऊन एक आठवडा नाही झाला कि सहभागी झालेल्या स्पर्धंकांमध्ये रोज भांडणे बगायला मिळत आहेत.

यंदाच्या पर्वात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहिण हसिना पारकर हिचा जावई जुबैर खान हा सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

लवकरच जुबैर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण, तो शोमधून बाद होऊन बाहेर पडणार नाहीये. तर यामागचे कारण काही वेगळेच आहे. हसीना पारकरच्या कुटुंबाने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला हा शो सोडावा लागू शकतो.

चित्रपट निर्माता असलेल्या जुबैरने ‘मी हसिना पारकरचा जावई आहे’, असे म्हणत शोमध्ये स्वतःची ओळख करून दिलेली. त्याचसोबत हसिना पारकरवर आलेल्या श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी आपण एक असल्याचेही त्याचे म्हणणे होते. आता एका इंग्रजी दैनिकामध्ये आलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचा सदस्य आणि ‘हसिना पारकर..’ चित्रपटाचा सह- निर्माता असलेल्या समीर अंतुले याने जुबैर हे सर्वकाही प्रसिद्धीसाठी करत असल्याचे म्हटलेय.

LEAVE A REPLY

*