VIDEO : #BiggBoss11 : मराठी कलाकार गर्विष्ठ असतात : शिल्पा शिंदे

0

‘बिग बॉस’ म्हटलं की त्यासोबतच चर्चा रंगते ती म्हणजे या घरातल्या वादाची.

विकास गुप्तासोबतच्या भांडणापासून ते ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्यासोबत शिल्पाचे उडणारे खटके यामुळेच  या कार्यक्रमाचा टीआरपीही वाढतोय.

मराठी कलाकार गर्विष्ठ असतात असे वक्तव्य शिल्पानी केले असून, आता ते व्हायरल आता होतेय.

विकास गुप्ताशी संवाद साधताना शिल्पा म्हणाली होती, ‘मराठी कलाकार खूप चांगले काम करतात.पण, त्यांच्याच मीपणा जरा जास्त असतो. मराठी लोकांचा हा त्रासच आहे, की त्यांचा गर्विष्ठपणा साऱ्याच्या आड येतो.’ एकीकडे मराठी कलाकारांच्या गर्विष्ठपणाविषयी वक्तव्य करणाऱ्या शिल्पाने विक्रम गोखले, मोहन आगाशे, स्मिता जयकर या कलाकारांच्या अभिनय कौशल्याची प्रशंसाही केली आहे.

तिच्या या वक्तव्यानंतर आता मराठी कलाविश्वातील मंडळी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

*