हिना खान आणि रॉकी यांचा बिग बॉसच्या घरात साखरपुडा होणार?

0

बिग बॉस या कार्यक्रमात नुकतेच स्पर्धकाच्या घरातले सदस्य त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात गेले होते.

शिल्पा शिंदेची आई, विकास गुप्ताची आई यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन आपल्या मुलांची भेट घेतली. तसेच अभिनेत्री गौरी प्रधान देखील तिचा पती हितेनला भेटायला बिग बॉसच्या घरात गेली होती. घरात गेल्यानंतर तिने हिनाला चांगलेच सुनावले.

आता हिना खानचा प्रियकर रॉकी जैस्वाल देखील प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. रॉकी हिनाला भेटण्यासाठी काही मिनिटांसाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहे.

हिना आणि रॉकी यांची भेट ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवरच झाली होती. तेव्हापासूनच ते दोघे नात्यात आहेत. हिनाच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. हिना आणि रॉकी बिग बॉसच्या घरात साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. कारण नुकत्याच दाखवण्यात आलेल्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये रॉकी हिनाच्या हातात अंगठी घालत असल्याचे दिसत आहे.

आता रॉकी आणि हिना बिग बॉसच्या घरात खरंच साखरपुडा करतात की नाही हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल.

LEAVE A REPLY

*