#BigBoss11 : हे आहेत ‘बिग बॉस 11’ चे 10 स्पर्धक!

0

आजपासून सुरु होणाऱ्या ‘बिग बॉस’ सीजन 11 च्या फायनल कंटेस्टंटची नावे समोर आली आहेत.

यात ‘भाबीजी घर पर हैं’मध्ये अंगुरी भाभीचा रोल करणाऱ्या शिल्पा शिंदेचे नाव आहे. शिल्पाने ‘भाबीजी…’ चे प्रोड्यूसर संजय कोहली यांच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला होता. शिल्पाने पालघर पोलीस स्टेशनमध्ये कोहलीविरुद्ध सतत ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल केली होती.

सपना चौधरी
– बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी हरियाणवी सिंगर सपना चौधरीही यावेळी बिग बॉमध्ये दिसणार आहे.
– सप्टेंबर 2016 मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने सपना प्रकाशझोतात आली होती. 
हितेन तेजवानी
– ‘कुटुंब’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ यांसारख्या मालिकेत काम केलेला अभिनेता हितेनने ‘बिग बॉस 11’ अगोदर ‘जोड़ी कमाल की’ आणि ‘नच बलिए 2’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.  
हिना खान
– पॉपुलर शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सोडलेली अक्षरा म्हणजेच हिना खान ‘बिग बॉस’ मध्ये झळकणार आहे.
– हिनाने अगोदर हे वृत्त खोटे सांगितले होते पण आता ती या शोमध्ये येणार असल्याचे समजते.
विकास गुप्ता
– टीवीचा कॉन्ट्रोवर्शियल प्रोड्यूसर-राइटर विकास गुप्ता ‘बिग बॉस 11’ मध्ये दिसणार आहे.
– विकास त्यावेळी खूप चर्चेमध्ये होता जेव्हा ‘ये है आशिकी’ आणि ‘प्यार तूने क्या किया’ यांसारख्या मालिकांत काम केलेला अभिनेचा   पार्थ समथानसोबत तो गे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते. 
बेनअफशा सोनावाला
– ‘रोडीज X-4 सीजन 13’ मधून चर्चेत आलेली बेनअफशा तिच्या खास स्टाईलमुळे ओळखली जाते.
– ती रोडीज मधील को-एक्टर वरुण सूदला डेट करत आहे. 
जुबेर खान
– दाऊद इब्राहमची बहन हसीना पारकरचा जावईही शोमध्ये सहभागी होणार आहे.
–  जुबेर खान प्रथमच कोणत्या शोमध्ये दिसणार आहे. 
शिवानी दुर्गा
– शिवानी दुर्गा नोएडा येथे राहते
– शिवानी एक स्प्रीचुअल गुरु आहे.  
प्रियंक शर्मा
– प्रोड्यूसर विकास गुप्ताचा खास मित्र. रोडीज राइजिंगमधून झाला फेमस
– प्रियंक ‘स्प्लिट्स विला 10’चा कंटेस्टंट आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तो सीजनचा विनर आहे.
ज्योति कुमार
– ज्योति कुमार मसौढी पटनाचा रहिवासी आहे.
– ज्योति एक चपरासीची मुलगी आहे आणि तिचे स्वप्न खूप मोठे आहेत. 

LEAVE A REPLY

*