Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळाच ठरणार अयोध्येची ओळख-योगी आदित्यनाथ

Share

अयोध्या : प्रभू श्रीरामचंद्रांचा पुतळा अयोध्येची खरी ओळख ठरणार आहे. त्यामुळे श्रीरामाचा पुतळा दर्शनीय भागात उभारण्यात येईल यासाठी जागा कोणती निवडायची याची चर्चा आम्ही करतो आहोत. पूजेसाठी श्रीरामाची जी मूर्ती असेल ती वेगळी असेल. मात्र श्रीरामाचा एक असा पुतळा उभारला जाईल जो अयोध्येची ओळख ठरेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभारला जाईल असे स्पष्ट केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती उभी करण्यासाठी एक-दोन जागा पाहिल्या आहेत. लवकरच जागा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. श्रीरामाची मूर्ती मंदिरात असेल आणि दर्शनासाठीची मूर्ती वेगळी असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती हिच अयोध्येची ओळख ठरणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती उभी करण्यासाठी एक-दोन जागा पाहिल्या आहेत. लवकरच जागा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. श्रीरामाची मूर्ती मंदिरात असेल आणि दर्शनासाठीची मूर्ती वेगळी असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!