Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याआरटीईच्या प्रवेशांमध्ये यंदा मोठी घट

आरटीईच्या प्रवेशांमध्ये यंदा मोठी घट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणार्‍या प्रवेशांमध्ये यंदा मोठी घट झाली आहे. राज्यात अद्याप 26 हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यात प्रवेशासाठी असलेल्या 96 हजार 684 जागांपैकी केवळ 65 हजार 876 प्रवेश झाले आहेत.

- Advertisement -

आरटीई प्रवेशांची मुदत संपत आली असून, अद्यापही उर्वरित प्रवेश का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान,आरटीईसाठी आणखी 20 ते 25 दिवस प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

आरटीईच्या प्रवेशांची सोडत जाहीर झाल्याला आता सुमारे दोन महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. राज्यामध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचेही प्रवेश जवळपास पूर्ण झाले आहेत; मात्र तरीही अजून 26 हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या असल्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

आरटीईच्या प्रवेशांसाठी 2020 या शैक्षणिक वर्षामध्ये एक लाख 15 हजार जागा होत्या. त्यात घट होऊन 2021 मध्ये या जागा 96 हजारांवर आल्या. यापैकी 82 हजार जागांसाठी सोडत काढण्यात आली असून, आता प्रवेशप्रक्रिया संपत आली असली, तरी प्रवेश झाले नसल्याचे चित्र आहे. जागा उपलब्ध असताना आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी रांगेत असतानाही प्रवेश का होत नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या