Big Boss 12 : हा क्रिकेटर जाणार बिग बॉसच्या घरात

0
मुंबई : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉसचा १२ वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे यावेळी बिग बॉसचा १२ सिझनमध्ये अनेक सेलिब्रेटींच्या नावाची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात क्रिकेटर श्रीसंत हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

‘बिग बॉस-१२’चे नवे सीझन १६ सप्‍टेंबरपासून सुरू होत आहे. विशेष म्‍हणजे, यंदा बिग बॉस लोणावळ्‍यात नाही तर गोव्‍यात होणार आहे. काही दिवसांपूर्वी, गोव्‍यात या शोचे ओपनिंग झाले. यंदाच्या सिझनमध्ये विविध कलाकार सामील होणार आहे. यामध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेला गोलंदाज श्रीसंत हे नाव चर्चेत आले आहे.

दरम्‍यान, माजी क्रिकेटर एस. श्रीसंत हा या शोत स्‍पर्धक म्‍हणून सहभागी होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍याचबरोबर बिग बॉस-११ ची विजेती शिल्‍पा शिंदे यंदाही बिग बॉसच्‍या १२ व्‍या सीझनमध्‍ये सहभागी होणार असून शोच्‍या प्रीमीयरमध्‍ये ती दिसणार आहे, अशी माहिती मिळते. यासोबतच उतरण या मालिकेमुळे नावारूपाला आलेली टिना दत्ता, देबिना बॅनर्जी, दीपिका कक्कर, सृष्टी रोडे, नेहा पेंडसे, रिधिमा पंडित यांसारखे कलाकार या सिझनमध्ये हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. बिग बॉस १२ आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

LEAVE A REPLY

*