बिग बाजारची ‘स्वातंत्र्यदिन’ महाबचत ऑफर

0
नाशिक । स्वातंत्र्यदिनाचे आचित्य साधून बीग बाजारने ग्राहकांसाठी दि. 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान महाऑफर योजना आणली आहे. मेगा डिस्काऊंट आणि महाबचतीच्या माध्यमातून बीग बाजार देशाचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरी करत आला आहे.

यंदा या ऑफरचे 11 वर्ष असून यंदाही ग्राहकांना विविध विस्तीर्ण श्रेणीतील दर्जेदार उत्पादनांवर आकर्षक डिल्स आणि सवलती दिल्या जाणार आहेत.

इलेक्ट्रोनिक, घरगुती वस्तु, किराणा माल,अन्नपदार्थ, किचन वेअर्स पासून गृहसजावटींच्या विविध वस्तू ग्राहकांना अविश्वनिय ऑफर्स आणि सवलतींच्या माध्यमातून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

पाचदिवसीय महाबचत आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त बचत आणि मुल्य देण्यावरच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ंदरम्यान ग्राहकांना अधिकाधिक बचतीची संधी मिळणार असल्याची माहिती बीग बाजारचे सीईओ सदाशिव नायक यांनी दिली.

यादरम्यान, विविध चहा उत्पादनाच्या 1 किलो खरेदीवर रुपये 80 ची सूट दिली जाणार आहे. याशिवाय एलएडी टीव्ही, इंडशक बेस कुकर, डिर्टजन्ट पावडर याच्या खरेदीवर अविश्वनिय सूट दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*