युवकावर बिबट्याचा हल्ला

0

अकोले (प्रतिनीधी) – तालुक्यातील डोंगरगाव येथील विजय लक्ष्मण उगले या युवकावर गावामधून मोटारसायकलवरून घरी जात असताना रविवारी सायंकाळी 7:30 वा अचानक बिबट्याने हल्ला केला.

त्यात त्याच्या पायाला पंजा मारून जखमी केले. दिवसेंदिवस आढळा परिसरात बिबट्याचे प्रमाण वाढत असून दिवसा पण दर्शन होत आहे.

त्यामुळे नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लक्ष्य घालून लवकरात लवकर पिंजरा लावावा असे नागरिकामधून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*