बिबट्याच्या हल्ल्यात देवळालीत तरुणाचा मृत्यू

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – बिबट्याच्या हल्ल्यात सेंटरींग काम करणार्‍या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास देवळाली-लाख रस्त्यादरम्यान तीनचारी येथे घडली.
रावसाहेब काशिनाथ बेंद्रे (वय 47) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रावसाहेब हा काम उरकून आपल्या घराकडे चालले होते. याच दरम्यान तीनचारी येथील कदम यांच्या वस्तीनजीक ते आले असता अचानक उसात दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावर झेप घेतली.
त्यात रावसाहेब खाली कोसळला. त्यात बिबट्याने नरडे पकडले. यात तो जखमी झाला. घटनेची माहिती कळताच मावसभाऊ दिलीप चांगदेव उंडे याने रावसाहेब याला राहुरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
पण वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वैरागर यांनी त्याला मयत घोषित केले. त्यानंतर ही बाब वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आली. तेही रूग्णालयात आले व त्यांनी हा बिबट्याचाच बळी असल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

*