भुवनेश्वर : प्रसिद्ध वाळू शिल्पकार पटनायक यांच्यावर हल्ला

0

रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्यावर अज्ञाताने हल्ला केला आहे.

त्यांच्यावर पुरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोणार्कमधील चंद्रभागा बिचवर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचे 1 डिसेंबर रोजी उद्धाटन झाले.

महोत्सवात सहभागी झालेला एक तरुण पटनायक यांच्याशी हस्तांदोलन करण्याच्या निमित्तानं त्यांच्या मनगटावरील घड्याळ खेचण्याचा प्रयत्न करत होता. हे लक्षात येताच पटनायक यांनी प्रतिकार केला. त्यावेळी त्यानं पटनायक यांच्यावर हल्ला केला आणि काही कळण्याच्या आत तो तिथून पळून गेला.

राज्य पर्यटन विभागाने या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. सुदर्शन पटनायक हे त्या महोत्सवाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत.

LEAVE A REPLY

*