Type to search

Breaking News मुख्य बातम्या राजकीय हिट-चाट

Viral Video : नवनियुक्त महिला खासदारांचा हा टिकटॉक व्हिडीओ बघाच ?

Share

भुवनेश्वर : यंदाच्या लोकसभा निवडणुकानंतर अनेक घटना भारतीय नागरिकांना विशेष असणार आहे. यामध्ये नुकताच टिकटॉक या अँपवरील व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां या दोन अभिनेत्रींनी हा व्हिडीओ तयार केला आहे. विशेष म्हणजे या दोन अभिनेत्री नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांचा एक टिक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात टिक टॉक फिवर आहे. देशातील प्रत्येक घरात टिक टॉकवर व्हिडीयो बनवणारा व्यक्ती असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.


दरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मां यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवर हा टिकटॉक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दरम्यान दोघींनी ही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून दोघीही अत्यंत ग्लॅमर अंदाजात दिसत आहेत. ‘बंगालाच्या नव्या खासदार. मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां. भारताची प्रगती होत आहे. भारताच्या या महिला खासदांचे चित्र डोळ्यांना सुखावणारे आहे’ असे ट्विटमध्ये लिहिले होते.

या दोन्ही अभिनेत्री बंगाली पश्चिम बंगालमधूनतृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां या पश्चिम बंगालमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या दोघीही तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत. निवडणूक निकालानंतर त्यांनी संसदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी संसदेच्या बाहेर उभं राहून फोटो काढला आहे. या फोटोवरूनही त्यांना ट्रॉल केले जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!