Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

भुसावळ : रेल्वे हद्दीतील विस्थापितांचे पुनर्वसनासाठी राष्ट्रीय दलित पँथरचे प्रांत कार्यालया समोर धरणे आंदोलन

Share

भुसावळ | प्रतिनिधी

वर्षभरापूर्वी येथील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले. मात्र अद्यापही त्यांचे पुर्नवसन करण्यात आलेले नसल्यामुळे त्यांचे तात्काळ पुर्नवसन करुन त्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने धरणे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबत प्रांत प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात, पालिका हद्दीतील पाच हजार विस्तापितांचे सर्वे क्र ६३-१ (१९.०० हेक्टर) या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुर्नवसन करणे, विस्थापित कुटुंबांना ५०० स्क्वे. फुट जागेवर पंतप्रधान आवास योजनेतुन घर बांधुन देऊन कुटुंब प्रमुखाच्या नावे ७/१२ उतारा देणे, सुविधा देणे या योजनेत विस्थापित वंचित राहणा कामा नये, पाच हजार घरांचे विस्थापितांना वाटप करतांना लॉटरी पद्धतीचा वापर करु नये, नगरसेवक, आमदार, नेत्यांची वशिलेबाजी खपवून न घेता पारदर्शक पद्धतीने घरांचे वाटप करणे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर दि.१५ रोजी सकाळी ११ वाजेपासून पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विशाल सोयंके, जिल्हा सरचिटणीस, प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास पारधी, जिल्हा कोषाध्यक्ष संजय लोखंडे, जिल्हा उपसचिव अनिल गंगावणे, जिल्हा संघटक गोविंद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ अहिरे, तालुका संघटक बाळु मगर, युवा शहराध्यक्ष अल्पेश मोरे, युवा शहराध्यक्ष अल्पेश मोरे, शहराध्यक्ष राजु तायडे, ॲड.सुनील पगारे यांनी सहभाग घेतला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!