Type to search

Featured जळगाव

भुसावळ पालिकेच्या कारभाराची चौकशी करा: विरोधी गटनेता उल्हास पगारे

Share

जिल्हाधिकार्‍यांकडे केली तक्रार

भुसावळ:

शहरातील आरोग्याच्या सुविधांसह विविध बाबींकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे साथीचे आजार पसरत आहे. शिवायत पालिकेच्या कारभारातही आर्थिक घोटाळे होत असल्याची शंका असून त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधी जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतच्या निवेदनात, शहरातील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गटारी, नाले तुळुंब भरलेले आहे यामुळे साथीचे आजार पसरत आहे. डेग्युमुळे शहरातील दहा जणांचा बळी गेला आहे. अनेकजण आजाराने त्रस्त आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी देवूनही दखल घेतली जात नाही. नागरिकांना उपचारासाठी पालिका रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्याचे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहे.

शहरातील समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेकडे धुर फवारणीसाठी फॉंगर मशीन उपलब्ध नसल्यामुळे ही आजारांचे प्रमाण वाढत आहे. पालिकेचे अग्नीशमन बंब खराब झाल्याचे भासवून दुरुस्तीसाठी ३५ लाखांचा खर्च दाखविण्यात येत आहे. पालिकेच्या खर्चातून अधिकारी व सत्ताधारी आपल्या खाजगी वाहनांत डिझेल भरत असल्याची माहिती असल्याचे निवेदनात नमुद आहे. या प्रकाराची चौकशी करावी.

पालिकेच्या सफाई कामगारांना मुलभुत सुविधाही पुरविल्या जात नाही. जुना सातारा भागाती रस्त्या निकृष्ट आहे. त्याची चौकशी करणे. पथदिव्याच्या ठेक्यात अनियमितता आहे. गटारी व रस्त्यांचे ठेके सत्ताधारी नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तींना देण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी संशय व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करुन जनेतला न्याय देण्याची मागणी गटनेता उल्हास पगारे यांनी निवेदनातून केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!