Type to search

जळगाव

  भुसावळ येथे वॉकेथॉनमध्ये ३५० जणांचा सहभाग

Share

(प्रतिनिधी) –

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आणि सिलव्हर लाईन स्पोर्टस अकॅडमीतर्फे रविवारी सकाळी आयोजित झालेेल्या वॉकेथॉनमध्ये शहरातील ३५० नागरिकांनी सहभाग घेतला. त्यात तब्बल २५० महिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे ३ ते १० वर्षे वयोगटातील बालकांनीही ५ किमी अंतर चालण्याचा टप्पा पूर्ण केला.

रविवारी सकाळी ६:४५ वाजता वॉकेथॉनला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सुरुवात झाली. प्रवीण फालक व डॉ. तुषार पाटील यांनी लडाखमध्ये आयोजित ४२ कीमी मॅरेथॉन यशस्वी पूर्ण केल्याने त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आली. डॉ.आंबेडकर मैदानावरून सुरुवात झाल्यानंतर शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, जामनेर रोड मार्गे हॉटेल हेवन व तेथून पुन्हा डॉ. आंबेडकर मैदानावर समारोप झाला .

या वॉकेथॉनमध्ये आस्था पाटील, संस्कार पाटील, विनीत पाटील, टिना अटवाल व कशिश अटवाल यांनी सहभाग घेतला. वॉकेथॉनच्या अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा नेहेते होत्या. वॉकेथॉनचे आयोजन दीपेश कुमार सोनार व प्रवीण पाटील यांनी केले होते. यशस्वीतेसाठी डॉ. चारुलता पाटील, गणसिंग पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, सचिन अग्रवाल, अंकित पोद्दार, निलेश लाहोटी, अमित अग्रवाल, मीना नेरकर, डॉ. निर्मल बलके, सुनील सोनगिरे, अखीलेश कानोजिया, प्रमोद कुमार शुक्ला, सचिन मनवानी, शुभम मंडलिक, अक्षय वाकोडे, बिट्टू कुमार, चारुलता अजय पाटील, अलका भटकर, डॉ.संजय नेहेते, विलास पाटील यांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!