Type to search

जळगाव

 भुसावळ : पिक कर्ज व विम्याचा लाभ द्या-जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Share

 भुसावळ (प्रतिनिधी) –

तालुक्यातील गोजोरा येथील विविध कार्यकारणी सोसायटीच्या तपासणी अहवालात अपहार झाला असून अनियमिमता आढळून आल्यामुळे संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तत्कालीन सचिवांनी प्रशासकाकडे संस्थेचे रेकॉर्ड अद्यापही दिलेले नसल्यामुळे विकासोच्या सभासदांना पिक कर्ज व पिक विम्या उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता समस्या सोडविण्याची मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतच्या निवेदनात, गोजोरा विकासोमध्ये अनियमितता आहे. तसेच तत्कालीन सचिवावर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. यामुळे विकासोचे कार्यालया डिसेंबर २०१८ पासून बंद आहे. या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती ही करण्यात आली आहे. मात्र तत्कालीन सचिवाकडून प्रशासक व नवीन सचिवांना कार्यालयातील दफ्तर अद्यापही मिळालेले नाही. तसेच दि. ३१ मार्च अखेर कर्जाचा भरणा करुन देखिल शेतकर्‍यांना नवीन कर्ज मिळत नाही. तसेच पिक कर्ज मिळण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. त्यानंतर कर्ज न मिळाल्यास विमाही मिळणार नाही. यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकर्‍यांना विम्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

याबाबत तहसीलदार यांना सहाय्यक निबंधक यांनी काराईबाबत प्रशासक अरविंद पाटील यांनी दि.७ व८ रोजी पत्र देवून काराई करुन दप्तर ताब्यात द्यावे व लाभार्थ्यांना पिक कर्जाचे वाटप करावे. कर्जाचे वाटप न होवून शेतकर्‍यांनी अत्महत्या केल्यास त्याला प्रशासन व सहकार विभाग जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर कमलाकर कोल्हे, नारायण राणे, मुरलीधर पाटील,कडू दोडे, तुकाराम तळेले, ज्ञानदेव राणे, देविदास पाटील, कौतिक गावंडे, शामलाल पाटील, गजानन पाटील, लक्ष्मण राणे, मधुकर धनगर, चंद्रकांत तळेले, वसंत पाटील, भागवत गावंडे, किशोर राणे, वासुदेव नेमाडे, प्रभाकर तळेले, जोत्स्ना ठोंबरे, शिवाजी पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!