आईच्या स्मरणार्थ नगरसेवक पिंटू कोठारी यांनी बनविले स्मशानभूमीत नवीन ओटे

0
भुसावळ । येथील स्मशानभूमीमध्ये कित्येक वर्षांपासून ओटे बनविलेले असून आज या ओट्यांची हालत व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी असून याकडे नगरपालिकेने कधी लक्ष दिले नाही. पण भुसावळ वासीयांच्या संपर्कात असणारे व कुठे काही घटना घडली त्या ठिकाणी धावणारे, परमार्थात स्वतःला वाहून घेणारे असे एकच नगरसेवक ते म्हणजे निर्मल कोठारी उर्फ (पिंटू कोठारी) हेच नाव भुसावळवासीयांच्या मनात रुजलेले आहे.अशा या नगरसेवकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ स्व.मोतीराम लखीचंद निमानी, स्व.विमलबाई रामेशचंद कोठारी यांच्या स्मरणार्थ सेवा या नावाने नवीन चार ओटे व एक विसाव्यासाठी ओटा स्वतःच्या एक लाख खर्ची करून भुसावळवासीयांसाठी तयार केले आहे.

शहराची दोन लाखाच्या वर लोकसंख्या असून हिंदू धर्मासाठी एकच स्मशानभूमी तापी नदीच्या काठावर बनविण्यात आलेली आहे.त्या स्मशानभूमीवर पाच ओट्यांची निर्मिती केलेली आहे. या ओट्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यामुळे आज ते ओटे रोज जळत असलेल्या प्रेताच्या अग्निमुळे कुजलेल्या अवस्थेत दिसत आहे. या ओट्याकडे पाहून स्मशानभूमीत प्रेत जळणार्‍या काही तरुणांनी चर्चा केली व आपण मिळुन वर्गणी जमा करू व हे जे ओटे पडक्या अवस्थेत आहे. त्यांना रिपेअरिंग करण्याचा प्रयत्न करू त्यातील काही तरुणांनी यासाठी नगरसेवक पिंटू कोठारी पासून सुरुवात करण्यासाठी भेट घेऊन स्मशानभूमीचा प्रश्न मांडू यासाठी गेले असता. मदत तर करणे दूरच राहिला.

यासाठी जो खर्च येणार तो सर्व उचलण्याची जबाबदार नगरसेवक पिंटू कोठारी यांनी घेतली व जुन्या ओट्यांसमोर नवीन चार ओट्यांची निर्मिती करून एक ओटा प्रेतासाठी विसावा घेऊन बांधलेले प्रेत त्या ठिकाणी ठेवून सोडण्यासाठी बनविण्यात आला आहे. आधी प्रेताला खाली ठेवले जात असे यामुळे अपमान होत होता.पण पिंटू कोठारी यांच्या मित्रांनी ही गोष्ट ज्या वेळेस सांगितली त्यावेळी त्या तयार होणार्‍या ओट्याच्या सोबत पुढे एक ओटा हा विसाव्यासाठी बनविण्यात आल्यामुळे प्रेत जाळण्यासाठी येणार्‍या लोकांची प्रेत खाली ठेवण्याची गैरसोय ही दूर झाली आहे.

स्मशान भूमीच्या परिसरात 50/60 बाकडे लावणार – प्रेत जाळण्यासाठी लागणार्‍या वेळापर्यत त्यास ठिकाणी लोकांना थांबावे लागत असल्यामुळे तेथे बसण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे लोकांना प्रेत जाळण्यापर्यत उभे राहावे लागते. यासर्व अडचणींचा विचार करून पिंटू कोठारी व त्यांच्या मित्रांनी आवाहन केले आहे. या ठिकाणी लावण्यात येणार्‍या बाकड्यासाठी मदतीचा हात पुढे करावा व या ठिकाणी येणार्‍या लोकांना प्रेत जळेपर्यत बसण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.

शववाहिनीची मोफत सेवा – कित्येक वर्षापासून पिंटू कोठारी यांनी शववाहिनीची मोफत सेवा सुरू केलेली असून दिवसभरातून पाच ते सहा ट्रिप या शववाहिनीच्या मारल्या जातात.

आठ दिवसांनी जुन्या ओट्यांची मर्रमत – नवीन तयार करण्यात आलेल्या पाच ओट्यांसाठी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी एक लाखाच्या वर स्व खर्चाने बांधकाम केले असून आठ दिवसांनी जुन्या ओट्यांचीही दुरुस्ती करणार असल्याची माहिती दिली. तसेच प्रेत जाळण्यासाठी रात्री येणार्‍यांची गैरसोय होत असल्यामुळे व अंत्यविधी करतांना त्यास ठिकाणी पुरेसा उजेड पडत नसल्यामुळे पिंटू कोठारी या ठिकाणी 100 वॅटचे तीन एल.ई.डी. लाईट लावणार आहे.

शिपायाचा प्रश्न मार्गी लावणार – तेरा वर्षांपासून स्मशानभूमीत साफ सफाई करीत असणार अरुण उत्तम रंधे या शिपायाचा पगाराचा मिटींगमध्ये कितीवेळा चर्चा होऊनही त्याला नगरपालिका पगार का देत नाही. मागील कारण समजू शकले नसून येणार्‍या मिटींगमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक पिंटू कोठारी या शिपायांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे व रंधेला न्याय मिळवून देणार असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

*