Type to search

जळगाव

मिरगव्हाण-वांजोळा रोडवर भरदुपारी रस्तालुट: दीड लाखाचा ऐवज लंपास

Share

भुसावळ:

येथील उज्जीवन स्मॉल फायनांसमधील कर्मचारी उमेश रंगनाथ सपकाळ (वय 29, रा. गोलाणी कॉम्प्लेक्स, वरणगाव रोड, भुसावळ) हे दि. 22 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वांजोळा येथून कर्जाची वसुल केलेली एक लाख 56 हजार 749 घेवून मिरगव्हाण मार्गे आपल्या दुचाकीने भुसावळ येथे परतत असतांना मिरगव्हाण नजीक तीन अज्ञात इसमांनी दुपारी 12 ते 12.15 दरम्यान त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून वरील रक्कम लुटुन नेल्याची घटना घडली.

घटने दरम्यान उमेश सपकाळ यांची दरोडेखोरां सोबत काही काळ झटापट झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बाजारपेठचे पो. नि. दिलीप भागवत, एएसआय तसलीम पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तालुका पो. स्टे.चे पो. नि. रामकृष्ण कुंभार हे दीपनगर येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी गेेले असल्याने ते घटनास्थळी पोहचू शकले नाही. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!