Type to search

Breaking News जळगाव

डॉ.जगदीश पाटील यांना टीचर इनोव्हेशन अवॉर्ड

Share

भुसावळ । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती पुणे येथील मराठी विषय अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना नवी दिल्ली येथील झेडआयआयईआय या संस्थेतर्फे टीचर इनोव्हेशन अवार्ड जाहीर झाला आहे.

नवी दिल्लीच्या श्री अरविंद सोसायटीच्या झिरो इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन्स फॉर एज्युकेशन इनिटीएटीव्हज म्हणजेच झेडआयआयईआयतर्फे भारतभरातील शिक्षकांसाठी शिक्षणातील शून्य गुंतवणूक अभियान आयोजित करण्यात आले होते.

यात शिक्षकांकडून अध्ययन-अध्यापनात संदर्भात विविध प्रकारचे उपक्रम व कल्पना मागविण्यात आल्या होत्या. त्यात डॉ.पाटील यांनी क्षमता विकासातून भाषा विकास या विषयावर आपली कल्पना झेडआयआयईआय यांच्याकडे सादर केली होती.

त्याबद्दल संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण, अनुभवसंपन्न व अभिनव शिक्षणासाठी योगदान दिले म्हणून आणि नवाचार अभियानात सहभाग घेतल्याबद्दल प्रशंसा पत्र म्हणून त्यांना टिचर इनोव्हेशन अवॉर्ड जाहीर केला असल्याचे झेडआयआयईआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांनी कळविले आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!