Type to search

जळगाव

महिलेकडून पोलीस वाहनाची तोडफोड

Share

भुसावळ । येथिल 32 खोली भागात जुन्या वादातून एका महीलेने दि. 14 रोजी सकाळी घरासमोर उभी असलेली बजाज प्लॅटीना या दुचाकीची तोडफोड केली.या प्रकरणी काही महीला पोलीसात तक्रार देण्यासाठी आले असता सदरहू महीलेने पोलीस ठाण्यात येवून गोंधळ घातला तसेच पोलीस ठाण्याबाहेर लावलेल्या पोलीस वाहनाची काच फोडली.याबाबत बाजारपेठ पोलिसात महीले विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार, येथिल 32 खोली भागातील फरजाना बी दाऊद या महीलेने मागील किरकोळ कारणाच्या वादावरून याच भागातील अनिस मजिद यांनी घरासमोर लावलेल्या प्लॅटीना बजाज दुचाकी क्रं.एम.एच.19-एएल-6935 या दुचाकीची तोडफोड केली. यामूळे याभागातील महीलेच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या महीलांनी तक्रार देण्यासाठी बाजारपेठ पोलीसात आल्या. याच दरम्यान सदरहू महीला ही पोलीस ठाण्यात येवून यांची कशी काय?

तक्रार घेता अशी विचारणा करून पोलीस ठाण्यात गोंधळ घातला व बाहेर येवून आवारात लावलेल्या पोलीस ठाण्याचे चारचाकी वाहन क्रं.एमएच-19-एम-0736 या वाहनाच्या समोरील काच दगडाने फोडला.तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्यात येण्यापुर्वी यामहीलेने बाजारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या जाम मोहल्ला भागातील सुभाष चौकी पोलीस ठाण्यातील टेबलावरील काचही फोडला. यामूळे शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात महीला पोलीस शिपाई वैशाली सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गून्हा दाखल करून फरजाना बी या महीलेस अटक करण्यात आली. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोडपकर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!