Type to search

जळगाव

भुसावळ: गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक

Share

भुसावळ:

शहरातील रेल्वे स्टेशन चौकी परीसरात चर्च जवळ सतिश रमेश सपकाळे (वय 21, रा. अकलुद ता. यावल) हा दि. 22 रोजी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा बागळुन फिरत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे डि.वाय.एस.पी गजानन राठोड, पो. नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. नरेंद्र चौधरी, यासिन पिंजारी, दिपक जाधव पो. कॉं. कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, तुषार पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला 5000 रुपयांचा गावठी कट्टा व 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस असा एकुण 5 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत बाजारपेठ पोलिसात गु. र. नं. 549/2019 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. ना नरेंद्र चौधरी करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!