Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ : शहरात आज पाच करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची...

भुसावळ : शहरात आज पाच करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली 455

जळगाव –

जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

- Advertisement -

तसेच एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ कॉलनी, गांधीनगर व दिपनगरातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या