Type to search

Featured जळगाव

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा भुसावळ येथे मृत्यू ; लिफ्टमध्ये पडल्याची चर्चा

Share
Bhusawal

भुसावळ  – प्रतिनिधी

यावल येथील तहसील कार्यालयातील लिपिक प्रशांत अशोक पाटील (३५ ) यांचा भुसावळ येथे दि.८ रोज लिफ्टच्या डक्समध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली. प्रशांत  पाटील हे भुसावळ येथे जखमी अवस्थेत आज   तेथील नागरिकांना आढळून आले. तेव्हा त्यांना जखमी अवस्थेत साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भुसावळ शहरातील आयोध्या नगरातील रहिवासी तथा यावल येथील तहसील कार्यालयामध्ये आवक-जावक विभागातील लिपिक पदावर होते. प्रशांत  पाटील  हे आयोध्या नगरातील जळगाव रोड लगतच्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेले होते.  दरम्यान, डक्समध्ये जखमी अवस्थेत आढळून आले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी पाटील यांच्या कुटुंबियांना यासंदर्भात माहिती दिली व त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पत्नी बोदवड येथील तहसील कार्यालयामध्ये आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!