Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलॉकडाऊन : उल्लंघन करणार्‍या 43 जणांवर कारवाई

लॉकडाऊन : उल्लंघन करणार्‍या 43 जणांवर कारवाई

भुसावळ / यावल  – 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन दरम्यान उल्लंघन करणार्‍या 43 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यात भुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत 17, शहर हद्दीत 10 तर तालुका हद्दीत 11 तसेच यावल येथे 5 जणांचा समावेश आहे.

- Advertisement -

कलम 144 लागू करण्यात आले असूनही काही नागरिकांकडून कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 11 वाहनधारकांसह 17 जणांवर कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन सुरु असतांना कायद्याचेे उल्लंघन करुन शहरात वाहने तसेच पायी फिरणार्‍या नागरिकांवर बाजापेठ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत शहरातील नाहाटा चौफुली, खडका चौफुली, स्टेशन चौकासह शहरात अनावश्यक फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.

188 प्रमाणे कारवावाई करण्यात आली. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड , पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, हेकॉ संजय भदाने, तसलीम पठाण, ईश्वर भालेराव, रवींद्र बिर्‍हाडे, विकास सातदिवे, नंदू सोनवणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, रमण सुरडकर, समाधान पाटील, सचिन पोळ यांनी केली.

तर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अकरा जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.  ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोकॉ युनूस शेख, विठ्ठल फुसे, राजेश पवार, राहुल महाजन, चालक इरफान काझी यांच्यासह आदींनी केली. तसेच शहर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हे दाखल करुन तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लॉकडाऊन सुरु असतांना नागरिकांना जिवनावश्यक वस्तू व औषधी खरेदीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रशासनाकडून सुट देण्यात येवूनही काही नागरिका कायद्याचे उल्लंघन करुन शहरात फिरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या