Type to search

maharashtra जळगाव

राज्यात सात हजार मेगावॅट विजेचा तुटवडा

Share

आशिष पाटील,भुसावळ – 

राज्यात 6 हजार 717 मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही तुट एनटीपीसीकडून भरुन काढण्यात आल्याने भारनियमनाचे संकट आले नाही.

थंडीच चाहूल लागतात राज्यात विजेची मागणी  वाढली. ही मागणी आता 19 हजार मेगावॅटवर जाऊन पोहचली आहे. 13 डिसेंबर रोजी राज्यात 19 हजार 839 मेगावॅटची मागणी होती.

मात्र प्रत्यक्षात निर्मिती 13 हजार 122 मेगावॅट झाली आहे. यामुळे 6 हजार 717 मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला होता. ही तुट एटीपीसीकडून भरुन काढण्यात आली. दरम्यान, दि. 16 रोजी दीपनगर प्रकल्पाच्या 500-500 मेगावॅटच्या दोन संचांमधून 750 मेगावॅट विजेची निर्मिती होत होती.

महाजनकोची निर्मिती- राज्यातील महाजनकोच्या सातही प्रकल्पातून शुक्रवारी झालेली विजेची निर्मिती अशी – दीपनगर- 750 मेगावॅट नाशिक -142, कोराडी-1274, खापरखेडा-998, पारस- 400, परळी-676, चंद्रपुर-1951. उत्तर महाराष्ट्रातील तीन वीज निर्मिती प्रकल्पांमधून दि. 13 रोजी 916 मेगावॅट विजेची निर्मिती झाली. यात दीपनगर 750, नाशिक 142 तर साक्री सोलर प्रकल्पातून 24 मेगावॅट असा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!