Thursday, May 2, 2024
Homeजळगावफुकट्या प्रवाशांकडून 12 लाखांचा दंड वसूल

फुकट्या प्रवाशांकडून 12 लाखांचा दंड वसूल

भुसावळ – Bhusawal -प्रतिनिधी :

भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम दि. 1 ते 14 सप्टेंबर या दरम्यान राबविण्यात आली यात वाणिज्य विभागाने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 12 लाख 16 हजार 270 रूपयांचा दंड वसुल केला.

- Advertisement -

भुसावळ – मनमाड , नाशिक

कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे अनियमित तिकीट यात्रा ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणारे साठी विशेष तिकीट तपासणी मोहीम ही दिनांक 1 ते 14 सप्टेंबर 2020 या दरम्यान भुसावळ – मनमाड दरम्यान ट्रेन क्र.01094 , ट्रेन क्रमांक 02779, भुसावळ ते नासिक दरम्यान ट्रेन क्रमांक 02142 , ट्रेन क्रमांक 02534, भुसावळ ते खंडवा दरम्यान ट्रेन क्रमांक 02779 , ट्रेन क्रमांक 01093 , ट्रेन क्रमांक 01016 , ट्रेन क्रमांक 01072 , ट्रेन क्रमांक 02150 , ट्रेन क्रमांक 02541 , या गाडी मध्ये विशेष तिकीट अभियान हे विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 14 सप्टेंबर 2020 या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.

या मोहिममध्ये एकूण 1338 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे.दररोज 15 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी या प्रवाशांकडून एकूण 1216270 / – रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमध्ये विना तिकीट प्रवास करणारे 1044 केसेस 8 लाख 19 हजार 975 रुपयाचा दंड वसूल , तिकिटांच्या बदलीचे 42 केसेस मधून 61340 रुपये दंड वसूल , ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर केल्याबद्दल 177 केसेस मधून 220105 रुपये दंड वसूल , निम्न श्रेणी चे तिकीट घेऊन उच्च श्रेणी मधून प्रवास करणारे 75 केसेस मधून 115030 रुपये दंड वसूल आकारले गेले आहे मध्य रेल्वे भुसावळ विभागाने सर्व प्रवाशांना योग्य तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे की, कोरोना साथीच्या रोगाचा धोका टाळण्यासाठी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या