Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसैन्यदलाच्या परीक्षेत भोसलाचे 9 विद्यार्थी चमकले; एनडीए, सीडीएस परीक्षांचा निकाल जाहीर

सैन्यदलाच्या परीक्षेत भोसलाचे 9 विद्यार्थी चमकले; एनडीए, सीडीएस परीक्षांचा निकाल जाहीर

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील भोसला करियर अकादमी, भोसला मिलिटरी स्कूल व भोसला मिलिटरी कॉलेजचे 9 विद्यार्थी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाच्या एनडीए, सीडीएस आणि एएफसीएटी परीक्षांमध्ये चमकले आहे. हे 09 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून नुकताच या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.) परीक्षेत भोंसला मिलिटरी स्कूलमधून कार्तिक लथ, अथर्व बनसोडे, निमिष गरडे आणि लक्ष अग्रवाल व भोसला करिअर अकादमीमधून शुभम तावरे व हर्ष मिश्रा हे उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीला दिले आहे. संस्थेने नेहमीच त्यांना आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सशस्त्र सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

शुभम तावरे हा सध्या भोंसला मिलिटरी कॉलेज येथून तर हर्ष मिश्रा हा पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. चे शिक्षण घेत आहे. भोसला करिअर अकादमीच्या तीन पदवीधर विद्यार्थ्यांनीही या नोव्हेंबर महिन्यात एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) आणि कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (सीडीएसई) उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी शुभम कुमारसिंग यांनी पहिल्या प्रयत्नात एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) परीक्षा क्लिअर केली. भारतीय वायुसेनेतील अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी ही चाचणी आहे.

रणजित कोकाटे आणि प्रवीण शेवाळे भोसला करिअर अकादमीचे विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये आर्मीसाठी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन अनिरुद्ध तेलंग, भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, भोसला करिअर अकादमीचे विंग कमांडर अनिल सिंघा यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या