‘त्यांनीे’ फुलवली हळदीची शेती

0
इगतपुरी । तालुक्यातील बहुतांश शेतकरी पारंपरिक भातशेतीच्या पद्धतीचा अवलंब करीत असताना पिंपळगाव घाडगा गावातील हरिश्चद्र भोसले यांनी चार ते पाच गुंठा जमिनीत नवीन हळदीची शेती केली आहे.

भोसले यांनी पारंपरिक शेती व्यवसायात प्रचंड आत्मविश्वास आणि अचूक नियोजनाची जोड देत नुसतेच अश्रू ढाळीत न बसता नवनवीन प्रयोगांच्या शोधात देखील यशस्वी शेती करून दाखवत नवा आदर्श समोर आणला आहे.

शेती व्यवसायात अनेक दु:खाच्या आसवांचा झुंजारपणाने सामना करून केवळ आत्मविश्वासाच्या बळावर या शेतकर्‍याने माहिती तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाने उभी केलेली शेती आदर्शदायी ठरत आहे.

शेतीत बरच काही करता येतं ते करण्यासाठी उरी जिद्द व प्रयत्नांची पराकाष्ठा असावी लागते ते भोसले यांच्या व्यक्तीरेखेतून प्रतीत होतेय. शेतीतून मिळणारे उत्पादन, त्यासाठी लागणारा खर्च व मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचे होत चालले होते. जमिनीचा कस हा चिंतेचा विषय होता.

त्यामुळे त्यांनी प्रवाहापासून वेगळे धोरण स्वीकारले.या शेतीत सरी पाडून थिबक सिंचनच्या माध्यमातून लागवड केली. विविध प्रकारच्या सेंद्रीय खतांचा मारा करत शेणखत, गांडूळखत शेतीला देऊन जीवदान दिले. त्यांच्या पत्नी सीताबाई देखील त्यांना शेतीत मदत करतात.

LEAVE A REPLY

*