Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

मध्यप्रदेशातही ‘हायहोल्टेज ड्रामा; जोतिरादित्य सिंधिया ‘ट्रेंडिंगवर’

Share

मध्यप्रदेश : एकीकडे राज्यात सत्तास्थापनेवरून ‘हायहोल्टेज ड्रामा’ सुरु असतांना आत मध्यप्रदेशातीळ राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. येथील काँग्रेसचे प्रमुख नेते सिंधिया यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल केला आहे. यामुळे चर्चाना उधाण आले असून यामुळे ते सोशल मीडियात ट्रेंडिंगवर आले आहेत.

दरम्यान सोमवारी (दि. २५) ज्योतिरादित्य यांनी ट्विटर अकाऊंटवरून तिची ‘कॉंग्रेस इंट्रो’ काढली असून नवीन बायोमध्ये त्यांनी स्वत: ला लोकसेवक आणि क्रिकेटप्रेमी असे वर्णन केले आहे. यावर त्यांनी खुलासा केला आहे कि, ‘मी जवळजवळ एक महिन्यापूर्वी माझा बायो बदलला. लोकांच्या सल्ल्यानुसार मी ते बदलले असून आता याविषयी ज्या अफवा उठत आहेत त्या पूर्णपणे निराधार आहेत.

परंतु राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे कि, लोकसभा निवडणुकीत कडव्या पराभवानंतर सिंधिया यांना पक्षात दुर्लक्ष केले जात असल्याची खदखद होती. सिंधियाचा रोष आणि त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्री कमलनाथ सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. त्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ट्विटनंतर मध्यप्रदेशातील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!