Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

भोपाळ : गणेश विसर्जनादरम्यान नाव उलटून ११ जणांचा मृत्यू

Share

मध्यप्रदेश : भोपाळ येथील खटलापुरा घाट येथे गणपती विसर्जना दरम्यान नाव तलावात उलटून अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच लोकांना वाचविण्यात यश आले आहे.

देशभरात काळ गणेश विसर्जनाची धामधूम होती. काल सायंकाळी (दि. १२) गणेश विसर्जन मिरवणुकानंतर भोपळा येथील खटलापुरा घाटावर गणेश विसर्जन करत असतांना अचानक नाव उलटली. यामध्ये तब्बल ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या ठिकाणी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. विसर्जनाकरता आलेल्या या नावेत एकूण एकोणीस लोक होते. मात्र, मुसळधार पावसामुळे तलावातील पाणी अचानक वाढले आणि ही दुर्घटना घडल्याचे समजते.

दरम्यान, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पिपलानी येथील ११०० क्वार्टर येथे राहणारे काही लोक गणपती विसर्जनासाठी खटलापूरा घाट येथे आले होते. विसर्जनादरम्यान नावेत अधिक लोक असल्याने नावेच तोल जाऊन नाव उलटल्याची माहिती मिळाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!