भोसलाच्या मुली करणार दिल्लीत संचलन

0
नाशिक । भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे पुतळ्यास मानवंदना करण्यासाठी भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रशिक्षण घेणार्‍या 100 विद्यार्थिंनी संचलन करणार आहे.

संपूर्ण लष्करी थाटात व वेशात 14 ते 15 वयोगटातील 100 विद्यार्थिनी आरके आश्रमपासून, नवी दिल्ली स्टेशन बाहेरील डॉ. मुंजे यांच्या पुतळ्यापर्यंत पहाडगंज मार्गे सकाळी साडेसात वाजता पथसंचलनात सुरुवात होणार आहे.

कार्यक्रमासाठी (निवृत्त) मेजर जनरल ध्रुव कटोच, माधुरी सहस्रबुद्धे( निवृत्त मुख्याध्यापिका) व दिल्लीच्या महापौर प्रीती अग्रवाल या उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*