भोकर सबस्टेशनवर वीज पडली; एक ट्रान्सफार्मर जळाला

0
भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील 10 गावांना वीजपुरवठा करणार्‍या महावितरणच्या भोकर येथील सबस्टेशनवर काल सायंकाळी वीज पडल्याने पाच एम.व्ही.ए.चा 1 ट्रान्सफार्मर जळाला सुदैवाने येथे असलेले आणखी दोन ट्रान्सफार्मर बचावले त्याचबरोबर येथे हजर असलेले चार कर्मचारही सुखरूप आहेत.
उर्वरीत दोन ट्रान्सफार्मर सुस्थितीत असल्याने काही भागात रात्री उशिराने वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले असले तरी येथे मोठी दुर्घटना टळल्याचे दिसत आहे.
परीसरात गेल्या चार दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी लागत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. 20 सप्टेंबरच्या सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सुरू असलेल्या ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू असतानाच एक वीज थेट महावितरणच्या एक नंबरच्या ट्रान्सफार्मवर येऊन पडली आणि परिसरात धुराचे लोट उठले.
यावेळी याठिकाणी उपस्थित असलेले महावितरणचे लाईनमन देवीदास मेघळे, सहाय्यक लाईनमन कृष्णा जाधव, वायरमन राहुल खंडागळे व सबस्टेशन ऑफरेटर संदीप आसने आदी उपस्थित होते. हा प्रकार सर्वांनी पाहिला. समोर केवळ धुराचे लोटच दिसत होते. तर बाहेर संततधार पाऊस सुरू होता त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

LEAVE A REPLY

*