ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

0
नाशिक :  ज्येष्ठ क्रीडामानसोपचार तज्ञ आणि राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक भीष्मराज पुरुषोत्तम  बाम यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
त्यांच्या  पश्च्यात पत्नी सुधा, पुत्र नरेंद्र व अजित असा परिवार आहे.  बाम सरांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) सकाळी अकरा वाजता नाशिक अमरधामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहरातील काही खेळाडूंना मार्गदर्शन करत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी रीघ लावली होती.

बाम सरांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ते कुठलाही आर्थिक फायदा न घेता निशुल्क विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक खेळाडूंचे गुरु होण्याचा मान मिळवला होता.

२०१४ साली राज्य शासनाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. विनिंग हॅबिट, टेक्निक्स फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स, संधीचे सोने करणारी इच्छाशक्ती, विजयाचे मानस शास्र, मन सज्जना हे त्यांचे गाजलेले साहित्य होय.

बाम सरांना दोन मुले आहेत त्यातील एक मुंबईत तर एक अमेरिकेत असतो. बाम सरांच्या अचानक जाण्याने धावपटू मोनिका अथरे म्हणाली की, कालच मी सरांना भेटले रेसच्या आधी ते मला फोनवरून मार्गदर्शन करत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकावी अशी त्यांची इच्छा होती. मी नक्की त्याचे स्वप्न पूर्ण करेल.

बाम सरांचे पोलीस दलात मोठे योगदान होते. अनेक खेळाडूंचे ते मार्गदर्शक ठरले. अशी प्रतिक्रिया नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

नाशिकच्या खेळाडूने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकावी अशी सरांची इच्छा होती. ते आम्हाला नेहमी म्हणत पण त्याचं स्वप्न पूर्ण होन्या आधी त्यांचं जाण धक्कादायक आहे, त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी दिली.

त्यांच्या महात्मानगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठो मान्यवरांची रीघ लागली आहे. पोलीस दलासह क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर याठिकाणी हजर झाले आहेत.

LEAVE A REPLY

*