भिंगार, एमआयडीसीमध्ये मोटारसायकल चोरी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील संतोष पाराजी झावरे (रा. पारनेर) यांची एम. एच 16 एडब्लु 7290 ही दुचाकी भिंगारमधून चोरी गेली आहे.

एमआयडीसी हाद्दीत बोल्हेगाव फाटा येथून वैभव दिलीप भोंगाडे यांची एम. एच 16 बीई 0900 ही दुचाकी बोल्हेगाव येथून चोरी गेली आहे. या दोन्ही घटनांची फिर्यादीनुसार संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरासह तालुक्यात देखील वाहन चोरींच्या समस्या वाढत चालल्याचे दिसत आहेे.

एमआयडीसी एका कंपनीत पगाराच्या वादाहून शेख नासिर अहमद (रा. मुकुंदनगर) यांना तिघांनी बेदम मारहाण केली. सोमवारी (दि.18) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विकास वंजारे, दादु वंजारे व अन्य एक असे तिघे कंपनीत गेले होते. त्यांनी पगार मागितला असता दोघांमध्ये वाद झाले.

पैस न दिल्याच्या कारणाहुन तिघांनी अहमद यांना बेदम मारहाण केली.

LEAVE A REPLY

*