Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: भिंगारच्या दाम्पत्याने सव्वाकोटी हडपले

Share

नोकरीचे आमिष; गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिक्षण संस्थेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवत सव्वा कोटी रुपये उकळल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.पोलिसांनी भिंगारच्या विजयनगर येथील दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुभाष बन्सी साळवे आणि अनिता सुभाष साळवे (दोघेही रा. विजयनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.नेवासा येथील रमेश गोरख चक्रनारायण यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.

साळवे यांची सद्गगुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान नावाने भिंगारला शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नेमणूक करावयाची अशी जाहिरात त्यांनी पेपरला दिली. त्यानुसार अनेक अर्ज आले. त्यातील चक्रनारायण यांच्यासह 19 लोकांकडून 1 कोटी 26 लाख 20 हजार रुपये घेतले. त्यांना शिक्षण संस्थेत नोकरीही दिली. पण जून 2007 ते जुन 2019 या काळात त्यांना नोकरीचा पगारच त्यांना दिला नाही. 2019 मध्ये या सगळ्यानांच संस्थेतून काढून टाकले. भिंगारच्या यशवंतनगर येथील डेअरी फार्म येथील संस्था बंद करून ती मेहतर खांडेगाव (ता.पाथर्डी) येथे चालू असलेल्या संस्थेत वर्ग केली. या नव्या संस्थेत नवीन कर्मचारी भरून ती सुरू केली. नोकरीसाठी सव्वा कोटी रुपये घेऊनही नोकरी न दिल्याचे फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!