Sunday, April 28, 2024
Homeनगरनगर : बाप-बेटे का इलेक्शन इम्तिहान

नगर : बाप-बेटे का इलेक्शन इम्तिहान

भिंगार कॅन्टोन्मेंट निवडणूक

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता पाहून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान उपाध्यक्ष मुस्सा सय्यद हे पुन्हा निवडणूक लढविणार असून त्यांचे आब्बा सादीकभाईदेखील यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे झाले तर एकाच वेळी ‘बाप-बेटे इलेक्शन का इम्तिहान’ देण्याची भिंगारमध्ये ही पहिलीस वेळ असणार आहे.

- Advertisement -

भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाच्या सात जागेसाठी कोणत्याही क्षणी निवडणूक घोषित होऊ शकते. बोर्डाने निवडणुकीची सगळी तयारी करून ठेवली आहे. काल महिला आरक्षणाचा सोडतीचा शेवटचा टप्पा बोर्डाकडून पूर्ण करण्यात आला. उपाध्यक्ष मुस्सा सय्यद यांचा वार्ड सेफ राहिल्याने ते पुन्हा त्यात तीन नंबर वार्डातून इलेक्शन लढणार आहेत.

त्यांचे वडिल सादीकभाई हेही दोन नंबर वार्डातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. सादीकभाई हे भिंगारमध्ये नावाजलेले नाव असून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. मुलगा मुस्सा यांना उपाध्यक्ष करण्यात त्यांनीच मास्टर माइंड खेळी खेळली होती. आता तेच निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.

कलीम शेख यांची अडचण
कलीम शेख हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून ते वार्ड नंबर दोनचे प्रतिनिधीत्व करत आहेत. सादीक सय्यद यांनीही याच वार्डातून तयारी चालविली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक कलीम शेख यांची अडचण झाली आहे. ते अपक्ष लढणार की पक्षांतर करणार याची चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या