Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: भिंगार, बालिकाश्रम रोडला भरदिवसा घरफोड्या

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या माधवबाग आणि बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळ्यात भरदिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

भिंगारमधील माधवबाग येथील मिलीटरीमॅनच्या घरात झालेल्या चोरीत चांदीचे पैजण, मिलीटरीचे आयकार्ड, मिलीटरी कॅन्टीने कार्ड चोरट्यांनी भरदिवसा लंपास केले. अनिल बाबा नरसाळे यांच्या घरात काल बुधवारी भरदिवसा ही चोरी झाली. नरसाळे हे पारनेर तालुक्यातील गोरेगावचे रहिवासी आहेत. भिंगारच्या माधवबाग येथील पारिजात इमारतीच्या ई विंगमधील त्यांच्या घरात ही चोरी झाली.

दुसरी घटना बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळ्यात घडली. अमृत कलश आपर्टमेंटमधील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा 1 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. नामदेव बाजीराव वायाळ यांच्या घरात ही चोरी झाली. तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!