Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

स्फोटकांनी 11 बोटी फोडल्या; वाळूतस्करांचे 80 लाखांचे नुकसान

Share

भीमा नदीपात्रात डीवायएसपी संजय सातव यांची धडक कारवाई

कुळधरण (प्रतिनिधी)-  कर्जतचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी कर्जत तालुक्यातील भीमा नदी पात्रात धडक कारवाई करत अवैधरीत्या वाळूउपसा करणार्‍या 11 बोटी जिलेटीनच्या स्फोटांनी फोडल्या. या कारवाईत वाळू तस्करांचे सुमारे 80 लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे सिद्धटेक, भांबोरा, दुधोडी, खेड भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा सुरू होता. अखेर पोलिस प्रशासनाने ठोस पाऊल उचलत बोटी फोडण्याची कारवाई केल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांना मिळाली. सकाळी साडेआठ वाजता ही माहिती समजताच त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच कर्जत कार्यालयातील कर्मचार्‍यांना माहिती देत कारवाईचे नियोजन केले. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना माहिती दिली. भांबोरा-सिद्धटेकचे मंडलाधिकारी कुंदेकर व कर्मचार्‍यांना कारवाईत सामील केले. कारवाईसाठी अजनुज येथून स्पीड बोटी मागवण्यात आल्या. या धडक कारवाईत जिलेटिनच्या सहाय्याने नदी पात्रात अवैधरित्या वाळूउपसा करणार्‍या 11 बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. यामध्ये सुमारे 80 लाखांचे नुकसान झाले.

या कारवाईत मंडलाधिकारी कुंदेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव, उत्तम राऊत, इरफान शेख, दादा टाके, किरण बोराडे, आदित्य बेलेकर, प्रताप देवकाते आदी सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!